GTag

Wednesday, March 1, 2017

whats app Jokes

एक मुलगा देवाला विचारतो,
'तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
ते तर एका दिवसात मरून जातं....!
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत
असतो.......!
'
देव उत्तर देतात,
.
.
.
.
.
.
'
भारी रे....!
एक नंबर ....!



Whats app
वर टाक...!!!
__________________________________________________________
ती समोरच्या दुकानात गेली....
.
तिथं दुकानदाराचा तरुण देखणा मुलगा सोडला तर दुसरं कोणीही
नव्हतं...
.
ती थोडीशी लाजुन म्हणाली, 'बोलायचं आहे'

तो : बोला...

ती : तुम्ही खुप छान दिसता... मला खुप आवडता तुम्ही.

तो शांतपणे म्हणाला, 'ते काहीही असुदे पण मी एकदा विकलेली मॅगी परत घेणार नाही.

खेळ खल्लास्स्स्स्स्स्स्स्स्स् तो पण 2 मिनिटात
__________________________________________________________
एका मुलीने आपल्या होणाऱ्या
नव-याला Whats app केला ...
"
आपले लग्न नाही होऊ शकत ..माझे दुसरीकडे लग्न ठरले आहे.."
मुलाला मोठा झटकाच बसला...
पण पुढील मिनिटांत त्या मुलीचा दुसरा sms आला...
"sorry sorry sorry
चुकून तुम्हाला send झाला"
मुलाला double heart attack आला
__________________________________________________________

महाराष्ट्रातील मित्रमंडळे व् ग्रुपची काही अजब नावे.....

.
.
आबा कावत्यात ग्रुप,बंबात जाळ ग्रुप,खाता काय बांधून देऊ ग्रुपकानात जाळ मित्र मंडळ,खळबळ ग्रुप,वाड्यावर या ग्रुप,निरागस ग्रुप,गायछाप मित्रमंडळगंजका ग्रुप,ऑनलाइन तालिम,चक्कीत जाळ ग्रुप,

अचानक भयानक मित्र मंडळ,

एकच वार सगलेच गार मित्र मंडळ,

क्वालिटी बॉईज,

केली चेश्टा दिला नाश्टा ग्रुप,

बेरोजगार बॉईज,

उलालालालाला लेओ ग्रुप,

आंबट ग्रुप,

भागात चर्चा ग्रुप,

नुसती उठाठेव बॉइज,

तुमच्यासाठी काय पण (टिप मागचे सोडुन) ग्रुप,

आलाय लहर करणार कहर मंडळ,

फुकट फराळ लगेच उलटी ग्रुप,

खंगरी नंगरी बॉईज,

वाळली उसाबर बॉईज,

६१६२ मित्र मंडळ,

ह्यांचा काय नेम नाही ग्रुप,

यंत्रणा ग्रुप,

गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा मित्रमंडळ,

इलाका तुमचा वट आमचा मित्र मंडळ,

खटक्यावर बोट जाग्यावर पलटी मित्रमंडळ,

घेता का इस्कटू बॉइज,

हरकून टूम बॉईज,

झुणका भाकर मंडळ,

मट्टा जिलेबी तालीम मंडळ

सनी ताई हनी दादा भजनी मित्र मंडळ....
__________________________________________________________
Whats app
हे लहान मुलांच्या डायपर सारखे असते.. काही नसेल तरी 5-10 मिनटानी बघावे लागते..!!
__________________________________________________________
ससा नेहमी धावतो ,पळतो तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य असते 15 वर्षे...
तेच कासव ना धावपळ करते , ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे .....
यावरून धडा घ्या
कामधंदे सोडा,आराम करा...अन whats app वापरा
__________________________________________________________

एक माणुस फार हुशारी झाडत होता - "लोखंडाला लोखंड कापतं हिर्याला हिरा कापतो "

तेवढ्यात मागुन एक कुञा येतो आणी त्याला चावतो... !!
__________________________________________________________
केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
__________________________________________________________

आम्ही बँकेवर आणि बँकेच्या कर्मचार्यांवंर विश्वास ठेवून आमचे लाखो रूपये त्यांच्या ताब्यात देतो.
अन् हे लोक रूपयांचा पेन सुद्धा दोरीने बांधून ठेवतात :D
__________________________________________________________
मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे...
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: ते आराम....
मी पुण्याचा आहे ना!

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे

.

.
फोटोग्राफर.
__________________________________________________________
·                     शाळेच्या मागील नदीमध्ये अनिल सर बुडत होते.
परश्याने बघितलं,
.
त्याच्या अंगात विज संचारली ,
.
अंगात जोश आला ,
.
रक्त नसा नसात जोरानं वाहू लागलं,
.
.
त्याणी आपलं दप्तर खाली टाकलं,
.
.
अंगातला शर्ट काढला,
.
.आणि
.
.
.
.
शर्ट हवेत फिरवत ओरडत पळत सुटला,
.
.
"
उद्या सुट्टी आहे,
उद्या सुट्टी आहे...".